एका महिला आणि ओला चालकाला... लिंक👇कमेंटमध्ये...​​​

Jun 12, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 week ago
Duration0:05
Video IDCTigCSFRQok
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views2.5K
Likes1
Comments0
Engagement Rate0.04%
Likes per 100 views0.04
Comments per 1K views0.00

Description

बदलापूरच्या जुवेलीगाव परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना या परिसरात घडली आहे. एक महिला आणि ओला चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. महिलेचं नाव मनिषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सांगलीत घरात घुसून एका हमाल नेत्याच्या 13 वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून निर्घुण पणे केली हत्या करण्यात आली आहे. आपल्या आईला ओला चालकाने मारलं, तीन वर्षाच्या मुलाचा जबाब दुहेरी हत्याकांडाने बदलापूर हादरलय. बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात एका महिलेची आणि पुरुषाची धारदार शस्त्राने हत्या झाली आहे. महिला आणि पुरुष ओला कारने बदलापुरात आले होते. महिलेचं नाव मनिषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आईला ओला चालकाने मारलं असा जबाब तीन वर्षाच्या लहान मुलानं दिला आहे. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे याची हत्या कुणी कोणी? याचा तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण बदलापूर शहर हादरून गेलं आहे. रक्तरंजित राड्यान सांगली हादरली रक्तरंजित राड्यान सांगली हादरलीय. घरात घुसून हमाल नेत्याच्या तेरा वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी हे कृत्य केलं आहे. वेदांत मारुती बंडगर वय 13 असे मृत मुलाचे नाव आहे. सांगलीतील संजयनगर परिसरातील एसटी कॉलनीत ही गोळीबाराची घटना घडली. माथाडी कामगार वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह मोठा फौज फाटा तयार आहे.

Related Videos

More videos from News98 Mahakesari