निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 12, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration0:05
Video IDHsM3GPZOzx0
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views2.2K
Likes5
Comments0
Engagement Rate0.23%
Likes per 100 views0.23
Comments per 1K views0.00
Description
रोहित पवार यांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी टीका सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळं कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही असे देखील गोरे म्हणाले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आजपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या आंदोलनावर गोरेंनी टीका केली. दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अमित शाहंच्या ठेवलेल्या कंपन्या म्हणणाऱ्या संजय राऊत यांनांही गोरे यांनी जशास तसं उत्तर दिलं. जर हे ठेवलेले असतील तर त्यांना कोणी ठेवलंय अशी टीका गोरेंनी केली.
राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील
महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वानी उचलला आहे. आम्ही सर्व समन्वयाने कामे करत आहोत. काल महायुतीची आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आम्ही सगळे एक मुखाने एक दिलाने राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी आहोत. महायुती व्यतिरिक्त देखील अनेक घटक आमच्याकडे सोबत आहेत. त्यामुळं राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील असे गोरे यावेळी म्हणाले. लोकशाहीमध्ये या गोष्टी होतं राहतात, समन्वय राहावा लागतो. काही कटुता होती पण आता ती संपलेली आहे, आम्ही सगळे एकत्रित कामं करण्याचा निर्णय घेतल्याचे गोरे म्हणाले.
शेतकरी सोडून आमच्यासाठी कुठलाच विषय महत्वाचं नाही
अस आंदोलन करण्याची गरज काय होती? हा निव्वळ राजकीय स्टंट आहे. मी कायतरी करतोय हे दाखवण्यासाठी केलेली स्टँटबाजी असल्याची टीका जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर केली. सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळं शेतकरी सरकारचे धन्यवाद करत आहेत. 30 जून आधी त्याची अंमलबजावणी होणार आहे, पण ते आमच्यामुळे झाली अस भासवण्यासाठी आंदोलन केलं आहे. पात्र आणि अपात्र शेतकरी यांच्यात वाद लावून राजकीय पोळी भाजून घेणे यापेक्षा वेगळा विषय नाही. शेतकरी सोडून आमच्यासाठी कुठलाच विषय महत्वाचं नाही असेही गोरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आमची भुनिका आहे, कोणी पुतळा मावशीची प्रेम दाखववायची गरज नाही असे गोरे म्हणाले.
कोणी कुठं विलीन व्हावं हे हा त्यांचा विषय
कोणी कुठं विलीन व्हावं हे हा त्यांचा विषय आहे. त्या विषयावर बोलणार नाही असे गोरे म्हणाले. ज्याने0 कुठं जायचं हा त्यांचा विषय आहे. ज्यांना आमच्याकडे यायचं तो त्यांचा विषय आहे असे गोरे म्हणाले. कोणी कोणाचं काम करावे हे त्यांचा विषय, गरज वाटली तर आमच्या उमेदवाराला पाठींबा द्या न्हणून मी ही विनंती करेन असे गोरे म्हणाले. सोपल साहेब आणि माझे सबंध चांगले आहेत. ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे दाखवतात. ते योग्य निर्णय घेतील, बार्शीतला आमदार होतोय यासाठी ते योग्य निर्णय घेतील. सोपल यांच्याशी देखील माझं बोलणं झाल्याचे गोरे यावेळी म्हणाले.
लातूरमधील शेतकऱ्याला दिलेल्या बैलासंदर्भात बोलताना गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. राज्याचा विकास करताना त्यांचं कणखर आणि शेतकऱ्यांसाठी मात्र संवेदनशील आहेत. आजारी रुग्ण, आजारी बैल सर्वांसाठी ते मदतीची भूमिका घेतात, या प्रकरणात नेमकं काय झालं याची माहिती घेऊ पण त्यांनी सदृढ बैल देण्याच्या सूचना केल्या होत्या असे गोरे म्हणाले.