नागपूरमधील विकासकामे व शहरातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने बैठक. Nitin Gadkari
Mar 29, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published3 months ago
Duration0:36
Video IDVF1Iy9Osx2w
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views4K
Likes71
Comments0
Engagement Rate1.76%
Likes per 100 views1.76
Comments per 1K views0.00
Description
📍नागपूर
नागपूरमधील विकासकामे व शहरातील नागरिकांच्या समस्या यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने आज राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
शहरातील विकासकामांच्या संदर्भात तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यासच्या व नझुल यांच्या मालकीचे सार्वजनिक उपयोगाचे असेलेले सर्व भुखंडांची झोननिहाय माहिती घेणे, नागपूर शहरातील एक लक्ष लोकसंख्या असलेल्या वस्तींमध्ये झोननिहाय भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल, हॉकर झोनची योजना राबवण्यासाठी उपाययोजना करणे, नागपूर शहरात २०० खेळांच्या मैदानांचा विकास करण्यासाठी उपाययोजना करणे, नागपूर शहरात २०० उद्यानांचा विकास करण्यासाठी उपाययोजना करणे, नागपूर शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बांग्लादेश पॅटर्न राबवणे, शहरातील आरक्षण असलेल्या भुखंडांवरील जवळपास ४५०० अनधिकृत अभिन्यासात करावयाची विकास कामे यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे नागपूर शहरातील नाग नदी व पोहरा नदी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती व भविष्यातील नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भुयार गटर योजना राबवण्याबाबत करावयाची उपाययोजना, नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अडचणी व प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, अमृत-२ आणि अमृत-३ योजनांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची सद्यस्थिती, जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण व भूसंपादनाच्या कामाची सद्यस्थिती, मौजा-चिंचभूवन येथील मिहान पुनर्वसन ते मौजा खापरी सीमेपर्यंत असलेल्या ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्यावरील जागेची भूसंपादन आणि प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, नागपूर शहरातील टप्पा-१, २, ३, ४, ५ अंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाची सद्यस्थिती, वयोश्री योजनांतर्गत मागील काळात मनपाकडून घेण्यात आलेल्या कामाबाबत चर्चा, समाज कल्याण विभागाकडून नागपूर महानगरपालिकेला दिव्यांगांसाठी व पात्र लाभार्थ्यांना ई-रिक्षा देण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा, नागरी दलित वस्ती योजना अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकासकामांच्या प्रस्तावाबाबत चर्चा, मनपा व नासुप्र यांच्या अर्थसंकल्पाच्या बाबींवर निर्णय करण्याच्या दृष्टीने सदर विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
#NitinGadkari