16 मे शनिवार वैशाख अमावस्या शनी जयंती दिवशी हे 2 विशेष उपाय नक्की करा गरीबी पैशांची अडचण दूर होईल

May 15, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now
Marathi Info
Marathi Info

3.1M subscribers

View Channel

Video Overview

Video Details

Published1 month ago
Duration5:57
Video IDbE4wvTCNe7s
Languagemr
CategoryHowto & Style
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views1.1K
Likes39
Comments5
Engagement Rate3.89%
Likes per 100 views3.45
Comments per 1K views4.42

Description

#amavasya #shanijayanti #marathi 16 मे शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे वैशाख अमावस्या. याच दिवशी शनी जयंती अर्थात श्री शनैश्चर जयंती सुद्धा आलेली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार वैशाख अमावस्येच्या दिवशी तसेच शनी जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने मनुष्याच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. तुमच्या घरात जर गरिबी असेल, पैसा येत नसेल तर या अमावस्येला आपण एक अतिशय प्रभावशाली असा उपाय नक्की करा. या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील एखादे पिंपळाचे झाड शोधावे लागेल. झाड छोटे असो, मोठे असो चालेल. या पिंपळाच्या झाडाखाली वैशाख अमावस्येच्या सायंकाळी तुम्ही जा आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करा. हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की वैशाख अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ता वेळी पिंपळाaच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. अर्थात माता लक्ष्मी पिंपळाच्या वृक्षामध्ये निवास करते. अशावेळी पृथ्वीतलावरील जो मनुष्य पिंपळाच्या वृक्षास स्पर्श करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्ष्मीचे आगमन होते. त्याच्या घरातून दारिद्र्याचा नाश होतो. परंतु मित्रांनो केवळ स्पर्श करणे पुरेसे नाही, तुम्ही या पिंपळ वृक्षाकडे जाताना सोबत थोडेसे मोहरीचे तेल नक्की घेऊन जा. एक मोहरीच्या तेलाचा दिवा या पिंपळ वृक्षाच्या बुंध्याशी अमावस्येच्या सायंकाळी आपण प्रज्वलित करा अर्थात हा दिवा लावा. या दिव्यामध्ये मोहरीचे तेल असेल. पिंपळाच्या वृक्षांमध्ये ब्रम्हा विष्णू आणि महेश अशा त्रिदेवता वास करतात. सोबतच या वृक्षांमध्ये पितृदेव अर्थात भगवान श्रीहरी श्रीविष्णु सुद्धा वास करतात. लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या सायंकाळी सूर्यास्त होत असताना करायचा आहे. सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर हा उपाय करू नका. एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करून या पिंपळ वृक्षाच्या आपण सात, नऊ किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिवा लावताना तसेच प्रदक्षिणा घालताना एक छोटासा मंत्र आपण आवर्जून म्हणा. मंत्र आहे - ओम नमो भगवते वासुदेवाय.. ओम नमो भगवते वासुदेवाय.. पिंपळ वृक्षाजवळ हा उपाय केल्यानंतर आपण आपल्या घरी या आणि हा उपाय या ठिकाणी संपतो. लक्षात ठेवा, उपाय केल्यानंतर आपण इतरत्र कुठेही न जाता, थेट आपल्या स्वगृही अर्थात घरी परत यावं. वैशाख अमावस्येच्या सायंकाळी केलेला हा छोटेखाणी उपाय आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन घडवून आणतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि घरातील गरिबी दारिद्र्य निघून जाते. तुमच्या मेहनतीला फळ येऊ लागतं. तुमचा दारिद्र्याचा फेरा नष्ट होऊन संपत्ती आणि ऐश्वर्याचा नवा मार्ग खुला होतो. लक्षात घ्या या दिवशी आपल्या पित्रांच्या नावे एक छोटसं काम आपण नक्की करावं. पित्र म्हणजे काय? तर आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्या व्यक्ती आपल्या पित्र असतात. प्रत्येक अमावस्येला या पितरांच स्मरण करणे म्हणजेच त्यांची आठवण काढणे, हे वंशज म्हणून आपलं कर्तव्य असतं. म्हणूनच वैशाख अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे आटोपून आपण एक छोटसं कार्य आपल्या पित्रांच्या निमित्त नक्की करा. हे कार्य केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि जर आपल्या घरात कुणाचा विवाह होत नसेल अर्थात लग्न होत नसेल किंवा मूलबाळ होण्यामध्ये काही अडचणी असतील, पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत असतील, वाद-विवाद आणि भांडण होत असतील किंवा घरामध्ये सुख शांती नसेल.. तर या सर्व समस्या या छोट्याशा उपायाने दूर होऊ लागतात. यासाठी नक्की काय करावे? तांब्याभर पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकावेत. एक तुळशीचे पान टाकावं आणि असं हे जल दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्घ्य स्वरूपात आपण अर्पण करावं. अर्घ्य अर्पण करणे म्हणजे हा तांब्या आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून हात उंचावून हळू हळू पानी ओतणे. हे अर्घ्य आपण आपल्या पितरांच्या नावे अर्पण करत आहोत. तेव्हा एक मंत्र आपण नक्की म्हणा - ओम पित्रोभ्यो नमः.. ओम पित्रोभ्यो नमः.. अशा प्रकारे सात वेळा या मंत्राचा जप करत संपूर्ण जल अर्पण करा आणि त्यानंतर हात जोडून आपल्या पितरांना प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये जी काही समस्या चालू आहे, पती-पत्नीमध्ये वाद विवाद होतात,घटस्फोटापर्यंत परिस्थिती आलेली आहे, मूलबाळ होत नाहीये, घरातील मुला मुलींचे विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत, घरामध्ये सुख शांती नाही अशा एक ना अनेक ज्या समस्या आहेत त्या आपल्या पित्रांना बोलून दाखवा आणि या समस्येतून मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करा. हा छोटासा उपाय जर आपण मनोभावे केला तर पित्र प्रसन्न होतात आणि आपलं जीवन सुखी समाधानी बनवतात. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे 2 उपाय आपण या शनी जयंतीच्या दिवशी तसेच वैशाख अमावस्येच्या दिवशी नक्की करून पहा. आपल्या जीवनात भगवान शिवशंभोंची, श्रीहरी श्री विष्णूंची असीम कृपा बरसो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये “जय शनिदेव” लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबीयांना जरूर शेअर करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओ साठी आपल्या मराठी इन्फो या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. ओम नमो नारायणा

Related Videos

More videos from Only Marathi