17 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण... लिंक👇कमेंटमध्ये...​​​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published5 days ago
Duration0:05
Video IDbWHEpzhdGz4
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views1.4K
Likes2
Comments0
Engagement Rate0.15%
Likes per 100 views0.15
Comments per 1K views0.00

Description

'लापता लेडीज'मधील दमदार अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नितांशी गोयल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने पहिल्यांदाच हजेरी लावत रेड कार्पेटवर आपली छाप पाडली. विशेष म्हणजे अवघ्या १७ व्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर चालणाऱ्या सर्वात तरुण बॉलिवूड अभिनेत्रींपैकी ती एक ठरली आहे.ब्लॅक ऑफ-शोल्डर गाऊनमधील तिचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. १२ जून २००७ रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जन्मलेल्या नितांशीने लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. दूरदर्शन मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र 'लापता लेडीज' हा तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला आयफा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.अभिनयासोबतच ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नितांशी मोठी कमाई करत आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार २०२४ पर्यंत तिची अंदाजे एकूण संपत्ती ५ ते ६ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. नितांशीने २०१५ मध्ये 'मिस पॅन्टालून्स ज्युनियर फॅशन आयकॉन' हा किताब जिंकत मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय टीव्ही शो, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Related Videos

More videos from News98 Mahakesari