शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 13, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published5 days ago
Duration0:05
Video IDbZEmGoILnSg
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views728
Likes2
Comments0
Engagement Rate0.27%
Likes per 100 views0.27
Comments per 1K views0.00
Description
धाराशिवच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे सुपरअॅक्टिव्ह खासदार ओमराजे निंबाळकर शांत का? पहिल्यासारखे धाराशिवच्या राजकारणात सक्रिय न दिसणारे ओमराजे पक्षाच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना आणि बैठकांना गैरहजर राहत आहेत. मतदारसंघातील त्यांचा वावरही पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याची चर्चा आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही भाष्य करत नाहीत. त्यामुळंच ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात असतानाही ओमराजे गप्प आहे.. त्यामुळं ओमराजेंच्या मनात नेमकं काय चाललंय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.ओमराजे निंबाळकर... उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार. शिवसेनेत मोठी फूट पडली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र त्या कठीण काळातही ओमराजे निंबाळकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले.ज्या पक्षाने मला घडवलं, त्या पक्षाशी मी कधीच गद्दारी करणार नाही, अशी भूमिका घेणारे ओमराजे सध्या मात्र राजकीयदृष्ट्या कमालीचे शांत झालेयेत. पक्षाच्या बैठका, संघटनात्मक कार्यक्रम आणि स्थानिक राजकीय घडामोडींमध्ये पूर्वीसारखी त्यांची उपस्थिती दिसत नाहीय. विशेष म्हणजे, उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही ओमराजे यांची अपेक्षित सक्रियता दिसलेली नाही.