तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड... लिंक👇कमेंटमध्ये...​​ ​

Jun 13, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published1 week ago
Duration0:05
Video IDgYsXT1puqYY
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short

Performance Metrics

Views1.5K
Likes6
Comments0
Engagement Rate0.40%
Likes per 100 views0.40
Comments per 1K views0.00

Description

एकीकडे लोक आर्थिक मंदीची चर्चा करत असताना भारत हा आजघडीला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताकडे परकीय चलनाचा प्रचंड साठा आहे. भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) असून लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकारची तपपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या काळात भारताच्या विकासाचा वारु कसा चौखूर उधळला आहे आणि भारताचे भविष्य किती सोनेरी आणि उज्ज्वल आहे, याचा पाढा वाचला. (PM Modi 12 years) या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युपीए सरकार आणि एनडीए सरकार यांच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणि देशाकडील परकीय चलनाचा साठा याबाबत सविस्तर विवेचन केले. लोकं मंदी मंदी मंदी असं सांगत होते, पण चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा दर 7 टक्क्याहून अधिक नोंदवला गेला आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जवळपास आपण 345 लाख कोटींचा टप्पा पार केला असून आपण 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आजघडीला भारताकडे परकीय चलनाचा साठा जवळपास 67 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. यामधून आपण पुढील 11 महिन्यांच्या सगळ्या आयात केलेल्या वस्तूंचे पैसे आणि भारताच्या डोक्यावर असलेले 94 टक्के विदेशी कर्ज कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. भारताने एक काळ असता बघितला आहे की, भारत विदेशी कर्जात बुडालेला होता, फ्रेजाईल फाईव्ह अर्थव्यवस्थांपैकी एक होता. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यावेळी भारताला सांगितलं होतं की, यामधून भारत बाहेर पडला नाही तर कर्जाच्या सापळ्यात अडकेल. कारण त्यावेळी भारताकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी विदेशी चलनाचा साठाच नव्हता. पण आज त्याच भारताकडे 94 टक्के विदेशी कर्जाचे पैसे एका दिवसात परत करावे लागले, तरी तेवढे परकीय चलन आहे. याशिवाय, भारताकडे 11 महिन्यांच्या इम्पोर्टचे पैसे आहेत. युपीए सरकारच्या काळात भारताकडे एक महिन्याची आयात करण्याइतकेही विदेशी चलन नसायचे. पण आज त्याच भारताकडे 11 महिन्यांची आयात करण्याइतके परकीय चलन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Videos

More videos from News98 Mahakesari