रितेश भाऊंचा फोन, लगेच होकार... लिंक👇कमेंटमध्ये...
Jun 6, 2026•Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3•Updated Just now
Video Overview
Video Details
Published1 month ago
Duration0:05
Video IDtKWYHApndUA
Languageen
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeYouTube Short
Performance Metrics
Views25.7K
Likes25
Comments1
Engagement Rate0.10%
Likes per 100 views0.10
Comments per 1K views0.04
Description
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यामध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने ‘पंताजी गोपीनाथ बोकील’ ही भूमिका साकारलीये. सुरुवातीला ही भूमिका एका वेगळ्या मराठी कलाकाराला ऑफर करण्यात आली होती. पण, संबंधित कलाकाराची एक अडचण निर्माण झाल्यामुळे पुढे, ऐनवेळी रितेशने जितेंद्र जोशीला या भूमिकेसाठी फोन केला होता. जितूने कसलाही विचार न करता या भूमिकेसाठी लगेच होकार दिल्याचं रितेशने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं होतं. याबाबत आता जितेंद्र जोशीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.जितेंद्र जोशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, “खरंतर एका दिवसात सुद्धा नाही…मी त्यांचा फोन आल्यावर लगेच होकार दिला. मला सायंकाळी ५:३० वाजता त्यांचा फोन आला होता. मला त्यांनी दोन प्रश्न विचारले, कुठे आहात? ‘म्हटलं मुंबईत…’ पुढचे, काही दिवस काय करताय? ‘म्हटलं, काही नाही…’; आता अनेकांना असं वाटलं असेल की, रितेश सरांनी आधी हिंदी कलाकाराला ही भूमिका विचारली असेल मग, त्याने नकार दिल्यावर मला विचारलं. पण, असं काहीही नाहीये. एका उत्तम मराठी कलाकाराला या भूमिकेसाठी विचारलं होतं. पण, खरंच काहीतरी अडचण होती म्हणून त्यांना शक्य होणार नव्हतं. म्हणून मग भाऊंनी मला फोन केला. तर, संध्याकाळी फोन आला ते म्हणाले उद्या शूट आहे. लूक टेस्टसाठी लगेच यायला सांगितलं. सेटवर पोहोचल्यावर मला समजलं की, महाराजांच्या वकिलाची भूमिका आहे पंताजी गोपीनाथ बोकील.”